-
गिरीजा ओक-गोडबोले (Girija Oak Godbole) ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
आपले सौंदर्य, मनमोहक हास्य आणि सहज अभिनय यांच्या जोरावर गिरीजाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. याच लोकप्रियतेमुळे तिला सोशल मीडियावर चाहत्यांकडून ‘नॅशनल क्रश’ (National Crush) ही पदवी मिळाली आहे.
-
गिरीजा ही प्रसिद्ध मराठी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची कन्या आहे.
-
गिरीजाने नुकतेच तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गिरीजाने गडद तपकिरी (Dark Brown) रंगाचा एक अत्यंत सुंदर ड्रेस परिधान केला असून तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या फोटोंना गिरीजाने ‘Fifty Shades Of Brown’ असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
गिरीजाने २०११ मध्ये प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक सुहृद गोडबोले यांच्याशी लग्नगाठ बांधली. या दांपत्याला ‘कबीर’ नावाचा एक मुलगा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा ओक/इन्स्टाग्राम)