-
लोकप्रिय अभिनेते आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांची सून, अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) सध्या तिच्या खास मराठमोळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी करतानाचा पूजाचा हा पारंपरिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
श्रावण महिना म्हणजे चहूकडे हिरवागार निसर्ग आणि ऊन-पावसाची रम्य पालखी! अशा या प्रसन्न वातावरणात मंगळागौरीच्या खेळांमुळे सणाचा उत्साह द्विगुणित होतो.
-
नवविवाहित स्त्री आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी मंगळागौरीचे पूजन करते.
-
या खास प्रसंगासाठी पूजाने पिवळ्या रंगाची आकर्षक पैठणी नऊवारी साडी परिधान केली होती.
-
या नऊवारी लूकवर पूजाने केलेला हलकासा मेकअप आणि केसांत माळलेली चाफ्याची फुले तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होती.
-
पूजाने २ डिसेंबर २०२५ रोजी अभिनेता आणि निर्माता सोहम बांदेकरबरोबर (Soham Bandekar) लग्नगाठ बांधली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा बिरारी/इन्स्टाग्राम)
आतड्यात सडतोय २-२ दिवस साचून राहिलेला मल, रात्री दुधात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या: सकाळी उठताच पोट होईल सहज साफ