-
कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) ही महाराष्ट्रातील लाडकी पार्श्वगायिका असून झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची ती विजेती ठरली होती.
-
कार्तिकीच्या संगीतमय प्रवासात तिच्या कुटुंबाचा आणि वारकरी संप्रदायाचा मोलाचा वाटा राहिला आहे.
-
कार्तिकीने अनेक मराठी चित्रपट, भावगीते आणि भक्तिगीतांना आपल्या सुमधुर आवाजाने सजवले आहे.
-
नुकतेच कार्तिकीने कुटुंबासोबत निसर्गाच्या सानिध्यात एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये कार्तिकी शर्ट आणि डेनिम जीन्स अशा वेस्टर्न लूकमध्ये नदीकाठी बसून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
-
जुलै २०२० मध्ये कार्तिकी रोनित पिसेबरोबर लग्नबंधनात अडकली.
-
या दोघांना ‘रिशांक’ नावाचा गोड मुलगा आहे. कार्तिकी नेहमीच मुलासोबतचे सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)
आतड्यांमध्ये कुजलेला मल झटक्यात पडेल बाहेर! फक्त माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ४ सोपे उपाय करा; पोट होईल पूर्ण साफ!