-
सकाळी झोपेतून उठल्यावर अस्वस्थता, पाण्याचे प्रमाण कमी होणे आणि थकवा जाणवणे ही एक सामान्य समस्या आहे. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी सकाळी हलका व पोट शांत ठेवणारा आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. आहारतज्ज्ञांच्या मते, सकाळी जास्त तेलकट किंवा जड अन्न खाल्यास पोटात गॅस होणे, सुस्ती येणे आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
-
शहाळ्याचे पाणी, केळी, पुदिना आणि बर्फ एकत्र फिरवून बनवलेले नैसर्गिक पेय शरीरातील खनिजांची कमतरता भरून काढते आणि ताजेतवाने ठेवते.
-
रात्रभर दुधात भिजवलेले चिया बियाणे आणि ताज्या फळांचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच पचनक्रिया सुलभ होते.
-
पाण्यात शिजवलेले ओट्स थंड ताकात मिसळून, त्यात भाजलेले जिरे टाकून प्यायल्याने पोटाला त्वरित थंडावा मिळतो आणि पचनशक्ती सुधारते.
-
दह्यामध्ये काकडी आणि जिरेपूड मिसळून बनवलेली कोशिंबीर पोटातील सूक्ष्मजंतूंचे संतुलन राखण्यास आणि उष्णता कमी करण्यास मदत करते.
-
सकाळी उपाशीपोटी कोरफडीचा ताजा रस पाण्यात मध मिसळून प्यायल्याने पोटातील जळजळ कमी होते आणि दाहशामक आराम मिळतो.
-
वाफेवर शिजवलेली इडली आणि नारळाची चटणी हा पचनास उत्तम असलेला आणि शरीरातील अंतर्गत दाह कमी करणारा एक आदर्श नाश्ता आहे.
-
पिकलेल्या पपईवर लिंबाचा रस पिळून खालल्याने त्यातील नैसर्गिक घटकांमुळे अन्न पचन होण्यास मदत होते आणि पोट शांत राहते. ( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या