-
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) लवकरच ‘दायरा’ (Daayra Movie) या क्राइम थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात करीनासोबत दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
या चित्रपटात करीना ‘DCP अजूनी कोहली’ या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.
-
तर दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन ‘DCP रमण कुमार’ यांची भूमिका साकारत आहे.
-
हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून, एका हाय-प्रोफाइल गुन्ह्याच्या तपासावर केंद्रित आहे.
-
या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी करीनाने परिधान केलेल्या तपकिरी रंगाच्या ब्लेझर सूटमधील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाकार क्षिती जोग, जितेंद्र जोशी आणि तृप्ती खमकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : करीना कपूर/इन्स्टाग्राम)