-
प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून ती नेहमीच आपले विविध फोटो शेअर करत असते.
-
मराठी कलाविश्वात आपल्या उत्कृष्ट नृत्यशैलीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या फुलवा खामकरचा चाहतावर्ग मोठा आहे.
-
नुकतेच फुलवाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये फुलवाने हिरव्या आणि निळ्या रंगाच्या आकर्षक चौकडी (चेक्स) डिझाइनच्या पारंपरिक साडीमध्ये पोज दिली आहे. जरीकाठ असलेली ही साडी तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
गळ्यात नाजूक सोन्याची साखळी आणि कानात सुंदर झुमके परिधान करून तिने तिचा पारंपरिक लूक पूर्ण केला आहे.
-
तिने मैत्रिणींबरोबरचा एक खास फोटो आणि स्वादिष्ट पारंपरिक जेवणाच्या ताटाचा फोटोही या पोस्टमध्ये शेअर केला आहे.
-
तिच्या या नव्या लूकवर आणि फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत असून हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: फुलवा खामकर/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला