-
रेवती लेले (Revati Lele) ही मराठी आणि हिंदी टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
रेवतीने नुकतेच पती कौशिक भिडेबरोबर (Kaushik Bhide) एक रोमँटिक फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रेवतीने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस, तर कौशिकने हिरव्या रंगाचा शर्ट आणि पांढरी पॅन्ट परिधान केली आहे.
-
रेवतीने या फोटोंना सोशल मीडियावर एक सुंदर रोमँटिक कॅप्शनही दिले आहे.
-
कौशिकने २०१९ मध्ये टीव्हीवर ‘स्वामिनी’ मालिका बघताना रेवतीला पहिल्यांदा पाहिले होते. त्यानंतर काही वर्षांनी पुण्यात एका कॉफी डेटदरम्यान त्यांची पहिली थेट भेट झाली.
-
रेवती आणि कौशिक यांचा विवाह २० फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यात पारंपरिक मराठी पद्धतीने पार पडला.
-
कौशिक हा व्यावसायिक ब्रँड डिझायनर असून त्याची स्वतःची डिझायनिंग कंपनी आहे; तसेच तो डिझायनिंगचे अध्यापनही करतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेवती लेले/इन्स्टाग्राम)
“७ वर्षांपूर्वी नोकरीसाठी पुण्यात आलेल्यांनी आम्हाला गणेशोत्सव शिकवू नये”, विद्यानंद बापटांवर रुपाली ठोंबरे पाटील यांची टीका