-
लोकप्रिय अभिनेत्री इशिता दत्ता शेठने (Ishita Dutta Sheth) हिंदी चित्रपट आणि हिंदी दूरदर्शन मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
सुप्रसिद्ध ‘दृश्यम’ (Drishyam) आणि ‘दृश्यम २’ (Drishyam 2) या चित्रपटांमध्ये तिने अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलीची (अंजू साळगावकर) भूमिका साकारली होती.
-
इशिता लवकरच बहुप्रतीक्षित ‘दृश्यम ३’ म्हणजेच ‘दृश्यम: द कंक्लूजन’ (Drishyam: The Conclusion) या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
-
‘दृश्यम’ सिरीजचा हा तिसरा आणि अंतिम भाग ठरणार आहे. या चित्रपटातून विजय साळगावकर (अजय देवगण) आणि त्याच्या कुटुंबाच्या कथेचा शेवटचा व निर्णायक टप्पा प्रेक्षकांसमोर येईल.
-
इशिताने सोशल मीडियावर साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये इशिता गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या आकर्षक डिझायनर बांधणी साडीत दिसत आहे.
-
या लूकवर इशिताने मोठे कानातले, बांगड्या आणि अंगठी अशा दागिन्यांची सुरेख पसंती दिली आहे.
-
हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी (गांधी जयंती म्हणजेच ‘दृश्यम डे’ च्या मुहूर्तावर) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इशिता दत्ता/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ