-
केसांच्या त्वचेवर आढळणारा कोंडा ही एक सामान्य समस्या असून ती घाम, रासायनिक शॅम्पूचा वापर, धुळीचा संपर्क आणि बुरशीमुळे निर्माण होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
दही हा कोंड्यावर मात करण्यासाठी वापरला जाणारा एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक घरगुती उपाय आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
दह्यामुळे केसांच्या त्वचेला थंडवा मिळतो आणि कोरडेपणा कमी होऊन काही काळ आराम मिळतो. परंतु, हा कोंड्यावर कायमस्वरूपी उपाय नाही, असे मत हैदराबाद येथील केअर हॉस्पिटलच्या वरिष्ठ त्वचाशास्त्रज्ञ डॉ. दिव्या सिद्धवरम यांनी व्यक्त केले आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
दह्यामध्ये असलेल्या लॅक्टिक आम्लामध्ये जंतूनाशक गुणधर्म असल्याने ते लक्षणांना आराम देते, परंतु समस्येच्या मूळ कारणावर ते प्रभावी ठरत नाही. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
आठवड्यातून एकदा दही त्वचेवर वीस ते तीस मिनिटे लावून नंतर चांगल्या अँटी-डँड्रफ शॅम्पूने ते स्वच्छ धुवावे, कारण दही राहिल्यास वास किंवा थर साचू शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
संवेदनशील त्वचा असलेल्या काही व्यक्तींमध्ये दह्यामुळे खाज किंवा जळजळ होऊ शकते, त्यामुळे वापरण्यापूर्वी लहान भागावर चाचणी घेणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
दीर्घकालीन नियंत्रणासाठी केटोकोनॅझोल, झिंक पायरीथिऑन किंवा सॅलिसिलिक ॲसिड घटक असलेले औषधी शॅम्पू वापरावेत आणि कोणत्याही उपचारापूर्वी त्वचाशास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
४ दिवसांनी ‘या’ ४ राशींची लागणार लॉटरी! बुधाच्या उदयाने सुरू होणार अच्छे दिन, धनसंपत्ती अन् सोन्याने भरेल तिजोरी