-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji TV Serial) ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अत्यंत लोकप्रिय ऐतिहासिक मराठी मालिका आहे.
-
ही मालिका २४ सप्टेंबर २०१७ ते २७ फेब्रुवारी २०२० या कालावधीत प्रक्षेपित झाली होती.
-
या मालिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकरने (Snehlata Vasaikar) ‘सोयराबाईंसाहेबांची’ भूमिका साकारली होती.
-
स्नेहलताने नुकतेच एका मराठमोळ्या रूपात खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्नेहलताने लाल रंगाची सुंदर नऊवारी बनारसी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील या लूकला स्नेहलताने पारंपरिक आणि भरजरी दागिन्यांची जोड दिली आहे.
-
स्नेहलताने फोटोंना दिलेले भावनिक कॅप्शन, “ती कणखर आहे… म्हणून तिला वेदना होत नाहीत, असं नाही. फक्त प्रत्येक जखम जगासमोर उघडी ठेवण्याची तिला सवय नाही. तिच्या शांत चेहऱ्यामागे अनेक वादळं येऊन गेली आहेत… पण प्रत्येक वेळी तिने स्वतःलाच सावरलं, स्वतःचे अश्रू पुसले आणि पुन्हा ताठ मानेने उभी राहिली. तिच्या डोळ्यांत नम्रता आहे, पण नजरेत लाचारी नाही. तिच्या बोलण्यात मृदुता आहे, पण निर्णयांमध्ये कमकुवतपणा नाही. ती नात्यांना जपते… पण त्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवत नाही. कारण कणखर स्त्री नेहमी मोठ्या आवाजात बोलत नाही… कधी-कधी तिचं शांत राहणंच तिच्या सामर्थ्याची सर्वात मोठी घोषणा असते.”
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहलता वसईकर/इन्स्टाग्राम)
तिलारी खोऱ्यात दुर्मिळ ‘वनमानवा’चे (स्लेंडर लॉरिस) दर्शन; जैवविविधतेचे रक्षण करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी