-
वीणा जगताप (Veena Jagtap) ही मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतील तिची भूमिका असो किंवा ‘बिग बॉस मराठी २’ मधील तिचा सहभाग, आपल्या खास शैलीमुळे ती घराघरात पोहोचली.
-
नुकतेच वीणाने निसर्गरम्य माळशेज घाटात एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पावसाळी पर्यटनस्थळांपैकी एक असलेला माळशेज घाट कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर (NH-61) पुणे-ठाणे सीमेवर वसलेला आहे.
-
पुण्यापासून सुमारे १२० किमी आणि मुंबईपासून १३० किमी अंतरावर असलेला हा पर्वतीय घाट हिरव्यागार दऱ्या, धुक्याने वेढलेल्या टेकड्या, खळाळणारे धबधबे आणि वळणदार रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे.
-
या फोटोशूटसाठी वीणाने गडद गुलाबी रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स असा कॅज्युअल लूक केला आहे.
-
हे फोटो शेअर करत वीणाने दिलंय एक खास कॅप्शन, “मैं चाहूँ तो आज भी मना लूं तुझे.. मगर तू वो रहा ही नहीं जिसकी मुझे तलब थी..”
-
(सर्व फोटो सौजन्य : वीणा जगताप/इन्स्टाग्राम)
३ दिवसांपासून आतड्यात कुजतोय मल? हे छोटे काळे फळ खा, पोट होईल साफ