-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझ्या सोबतीने’ (Tujhya Sobatine TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर (Maadhavi Nemkar) ‘तायडी’ या खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
या मालिकेतील ‘तायडी’ ही व्यक्तिरेखा इतरांना अपराधाची जाणीव करून देऊन स्वतःचे काम करून घेण्यात कमालीची तरबेज दाखवली आहे.
-
तायडीचा नशिबावर अजिबात विश्वास नाही. तिचे स्पष्ट मत आहे की, “आपल्याला हवी असलेली गोष्ट स्वतः मिळवायची असते, ती नशिबावर सोडायची नसते.”
-
या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या माधवीने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले असून, त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये माधवीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.
-
हे फोटो शेअर करत माधवीने अत्यंत सुंदर कॅप्शन दिले आहे, “फक्त एक स्त्री, तिची विचारसरणी आणि एक शांत सकाळ…”
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत