-
‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरिजवर आधारित चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगांवकर ‘मिर्झापूर: द मूव्ही’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
सध्या श्रिया पिळगांवकर तिच्या या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
या प्रमोशनच्या निमित्ताने श्रियाने एक खास फोटोशूट केले असून त्याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
प्रमोशनसाठी श्रियाने निवडलेला हा रंगीबेरंगी अनारकली ड्रेस अत्यंत आकर्षक असून त्यात तिची स्टाइल खूपच उठून दिसत आहे.
-
आपला हा पारंपरिक लूक परिपूर्ण करण्यासाठी श्रियाने यावर अतिशय सुंदर आणि जड दागिन्यांची निवड केली आहे.
-
कानात घातलेले मोठे पारंपरिक झुमके आणि हातातील डिझायनर बांगड्यांमुळे तिच्या या लूकला एक रॉयल लूक मिळाला आहे.
-
या खास अवतारात श्रियाने कॅमेऱ्यासाठी अत्यंत स्टायलिश पोझ दिल्या असून तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रिया पिळगावकर/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत