-
पपई आणि चिया सीड्स यांचे हे दोन पदार्थांचे मिश्रण पचनसंस्थेच्या तक्रारी दूर करून बद्धकोष्ठतेच्या समस्येवर अत्यंत प्रभावी ठरू शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
त्यांच्या मते, चिया सीड्स पाण्यात भिजवल्यानंतर जेलसारख्या मऊ पदार्थात रूपांतरित होतात आणि त्यांचा आकारही मोठ्या प्रमाणात वाढतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
या गुणधर्मामुळे शौचाला मऊ होण्यास मदत होते, ज्यामुळे पोट साफ होताना जास्त जोर लावावा लागत नाही आणि आतड्यांतील जळजळही कमी होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पपईमध्ये भरपूर फायबर, पाणी आणि ‘पापेन’ नावाचे एन्झाइम असते, जे प्रथिनांचे विघटन करून आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी पपई, भिजवलेले चिया सीड्स, एक कप पाणी आणि दही एकत्र करून बनवलेली स्मूदी पिण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
चिया सीड्स नेहमी ३० मिनिटे भिजवूनच वापरावेत, तसेच वायू किंवा अतिसार टाळण्यासाठी फायबरचे अतिसेवन न करता योग्य प्रमाणातच सेवन करावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ