-
मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप हिने आपल्या उत्तुंग अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
-
‘सावळ्याची जणू सावली’ या गाजलेल्या मालिकेत तिने साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली असून तिच्या अभिनयाचे सर्वत्र प्रचंड कौतुक झाले होते.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या वीणाने नुकतेच तिचे काही नवीन आणि अत्यंत आकर्षक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
वीणाने या फोटोशूटसाठी पिवळ्या आणि हिरव्या शेडमधील खास सिल्कचा इंडो-वेस्टर्न जॅकेट आणि मॅचिंग प्लाझो पँट परिधान केली आहे.
-
तिच्या या डिझायनर जॅकेट वर सुरेख मणी आणि पट्टीचे काम दिसून येत असून कॉलरला आणि बाहींना पारंपरिक पैठणीची किनार दिली आहे.
-
या सुंदर आऊटफिटबरोबर तिने गळ्यात पारंपरिक सोन्याचे हार, हातात मोठी अंगठी आणि कानात नाजूक झुमके घातले आहेत.
-
मोकळे सोडलेले केस, कपाळावर छोटीशी टिकली आणि हलकासा मेकअप यांमुळे तिच्या सौंदर्याला अधिकच उठाव आला आहे.
-
आपल्या या खास फोटोशूटला वीणाने “गुलाबाला परवानगी लागते, मोगरा हक्क गाजवतो” अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वीणा जगताप/इन्स्टाग्राम)
आतड्यांमध्ये कुजलेला मल झटक्यात पडेल बाहेर! फक्त माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ४ सोपे उपाय करा; पोट होईल पूर्ण साफ!