-
मराठी मनोरंजन विश्वाची ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे नेहमीच प्रेक्षकांची लाडकी राहिली आहे.
-
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या श्रेयाने नुकतीच एक खास नवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
श्रावण महिन्याचे औचित्य साधत श्रेयाने आपल्या घरी अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने पूजा केली आहे.
-
शेअर केलेल्या एका खास फोटोमध्ये श्रेया तिच्या पतीबरोबर श्रद्धेने पूजेला बसलेली दिसत आहे.
-
या पूजेसाठी श्रेयाने हिरव्या रंगाची सुंदर जरीकाम असलेली काठपदराची साडी नेसली आहे. तिने गळ्यात मोत्यांचा व सोन्याचा चोकर हार, कानात कुडी आणि नाकात पारंपरिक नथ परिधान केली आहे.
-
हातात भरलेला हिरवा चुडा आणि कपाळावरची छोटीशी टिकली तिच्या या साध्या अन् सौंदर्यपूर्ण लूकला अधिकच खुलवत आहे.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये पूजा स्थान विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी आणि केळीच्या पानांच्या सजावटीने अतिशय सुंदर सजवलेले दिसत आहे.
-
या सर्व मनमोहक फोटोंना अभिनेत्री श्रेयाने सोशल मीडियावर ‘श्रावण rituals’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
आतड्यात सडतोय २-२ दिवस साचून राहिलेला मल, रात्री दुधात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या: सकाळी उठताच पोट होईल सहज साफ