-
मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) हे मराठी मनोरंजन विश्वातील एक बहुआयामी आणि अभ्यासू नाव आहे.
-
अभिनयाबरोबरच नृत्य, लेखन, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन अशा विविध क्षेत्रांत तिने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
‘कुंकू’, ‘एका पेक्षा एक: जोडीचा मामला’, आणि ‘अप्सरा आली’ यांसारख्या विविध लोकप्रिय मालिका व कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली मृण्मयी सध्या ‘सारेगमप’ या संगीतमय मंचाचे बहारदार सूत्रसंचालन करत आहे.
-
संगीताची विशेष आवड असणाऱ्या मृण्मयीसाठी ‘सारेगमप’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, ‘झी मराठी’च्या कुटुंबात पुन्हा परतण्यासारखा आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक सुंदर अनुभव आहे.
-
नुकतेच मृण्मयीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर साडीतील काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मृण्मयीने जांभळ्या रंगाची डिझायनर साडी आणि त्यावर उठून दिसणारा फिकट हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या डिझायनर लूकवर मृण्मयीने परिधान केलेले नाजूक मोत्यांचे दागिने, हटके हेअरस्टाईल आणि मिनिमल मेकअप तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)
“छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता”; संजय राऊत यांचं विधान