-
झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali TV Serial) ही मालिका समाजात आजही असलेल्या वर्णभेदावर आणि सौंदर्याच्या चुकीच्या कल्पनांवर भाष्य करते.
-
या मालिकेची कथा ‘सावली’ नावाच्या एका गुणी मुलीभोवती फिरते. सावलीचा आवाज अतिशय गोड असून ती उत्तम गाते; मात्र तिच्या सावळ्या रंगामुळे तिला सतत समाजाच्या टोमण्यांचा आणि भेदभावाचा सामना करावा लागतो.
-
या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) ‘सावली’ची मुख्य भूमिका साकारत आहे.
-
आपली कला, गुण आणि निर्मळ मनाच्या जोरावर सावली समाजाच्या या संकुचित मानसिकतेवर कशी मात करते, याचा रंजक प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला आहे.
-
प्राप्तीने नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राप्तीने लाल रंगाचा एक सुंदर कुर्ता सेट परिधान केला आहे.
-
नो-मेकअप लूक आणि केसांत माळलेले फूल प्राप्तीच्या या सोज्वळ रूपाला अधिकच खुलवत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ