-
‘ही दोस्ती तुटायची नाय’ (Hi Dosti Tutaychi Naay Marathi Natak) हे एक अत्यंत लोकप्रिय आणि भावनिक मराठी नाटक आहे.
-
मित्रांमधील घट्ट नाते, विश्वास, गैरसमज आणि एकमेकांसाठी कासावीस होणारे मन या विषयांवर हे नाटक आधारित आहे.
-
तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हे नाटक भुरळ घालत आहे.
-
या नाटकात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता बने मुख्य भूमिकेत आहे. तिच्याबरोबर तिचा पती व अभिनेता शुभंकर एकबोटे, सुमीत राघवन आणि चिन्मयी सुमीत हे कलाकार देखील आहेत.
-
अमृताच्या या नाटकाचे दिग्दर्शन सूरज पारसनीस यांनी केले असून लेखन ओंकार गोखले यांचे आहे.
-
अमृताने नुकत्याच केलेल्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने आकाशी रंगाची चेक्स साडी आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे, ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता बने/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत