-
अभिनेत्री शिवानी सुर्वे ही मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
नुकताच २८ ऑगस्ट रोजी शिवानी सुर्वे हिचा वाढदिवस पार पडला आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून तिने सोशल मीडियावर तिच्या खास क्षणांचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवानी रात्रीच्या वेळी एका उंच इमारतीच्या टॅरेसवरून शहराच्या सुंदर रोषणाईचा आणि दृश्याचा आनंद घेताना दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये ती तिचा पती अजिंक्य ननावरे सोबत रोमँटिक पोझ देताना पाहायला मिळत आहे.
-
फोटोंमधील तिच्या लूकबद्दल बोलायचे तर तिने कॅज्युअल आणि स्टायलिश असा ब्लॅक टॉप व ब्राऊन शॉर्ट्स परिधान केली आहे.
-
तिने शेअर केलेल्या एका फोटोत ती टेबलवर ठेवलेल्या स्वादिष्ट केकचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.
-
शिवानीच्या या वाढदिवसाच्या खास फोटोंवर तिचे चाहत्यांनी भरभरून लाइक्स आणि कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी सुर्वे/इन्स्टाग्राम)
दिवाळीच्या ४२ दिवस आधीच ‘या’ राशींची होणार भरभराट; बुध आणि शुक्र घेऊन येणार प्रचंड श्रीमंती, एश्वर्य अन् सुख-समृद्धी