-
आज म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी सध्या विशेष चर्चेत आली आहे.
-
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर कश्मिरा कुलकर्णी हिने एक अत्यंत सुंदर आणि आध्यात्मिक फोटोशूट केले आहे.
-
या खास फोटोशूटमध्ये कश्मिराने एकाच वेळी राधा आणि कृष्ण, असे दोन्ही नयनरम्य लूक साकारले आहेत.
-
राधाच्या रूपात तिने पारंपरिक दागिने, नथ आणि भरजरी पेहराव परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
तिने कृष्णाच्या रूपात अंगाला निळा रंग लावून, हातात बासरी आणि डोक्यावर मोरपिसाचा मुकुट परिधान करून एक अनोखा अंदाज दाखवला आहे.
-
या पोस्टला ‘कधी मी राधा… कधी मी कृष्ण… पण खरं तर दोघंही माझ्यातच. प्रेम करण्याची ओढ म्हणजे राधा आणि प्रेमाला समजून घेण्याची जाणीव म्हणजे कृष्ण. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक राधा आहे… आणि एक कृष्णही,’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: कश्मिरा कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी निलकांती यांची पहिली पोस्ट; लिहिले फक्त ‘हे’ ३ शब्द