-
आज ४ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करणाऱ्या वैष्णवी कल्याणकरने जन्माष्टमीनिमित्त एक खास फोटोशूट केले आहे.
-
तिने या सुंदर फोटोशूटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
-
वैष्णवीने पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोशाख आणि त्यावर लाल रंगाची नक्षीदार ओढणी परिधान केलेली दिसत आहे.
-
राधेच्या रूपात सजलेली वैष्णवी झोपाळ्यावर बसून हातात बासरी धरून ती वाजवण्याचा सुंदर अभिनय करताना दिसत आहे.
-
कपाळावर आणि डोळ्यांच्या बाजूला काढलेली सुंदर नक्षी तसेच केसात खोवलेले मोरपीस तिच्या या पारंपरिक साजाला परिपूर्ण करत आहे.
-
ही पोस्ट शेअर करत वैष्णवीने ‘कान्हाच्या रंगात रंगलेलं मन… मुरलीच्या सुरांत हरवलेले क्षण… Happy Janmashtami’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
वैष्णवीचे हे खास कृष्णजन्माष्टमीनिमित्त केलेले रूप आणि तिचा हा मनमोहक अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. (सर्व फोटो सौजन्य: वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी निलकांती यांची पहिली पोस्ट; लिहिले फक्त ‘हे’ ३ शब्द