-
झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करीत असून, मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
याच मालिकेत अभिनेत्री पूर्णिमा डे आपल्या सशक्त आणि उत्तम अभिनयशैलीने प्रेक्षकांची मने जिंकत असून, तिची ही भूमिका तुफान गाजत आहे.
-
नुकतेच पूर्णिमाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एका नव्या फोटोशूटचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये पूर्णिमाने परिधान केलेली जांभळ्या रंगाची शिमरी साडी अतिशय आकर्षक दिसत असून, तिचा हा मॉडर्न खूपच छान दिसत आहे.
-
या सुंदर साडीसोबत तिने सीक्वेन्स आणि एम्ब्रॉयडरी वर्क असलेला फुल स्लीव्हज डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
हवेत उडणारे मोकळे केस, न्यूड शेड लिपस्टिक आणि सिम्पल ज्वेलरी, असा मिनिमल मेकअप करून तिने हा लूक अतिशय सुरेख रीतीने कॅरी केला आहे.
-
कॅमेऱ्यासमोर दिलेल्या तिच्या खास अदा आणि तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
-
तिचा हा मनमोहक आणि स्टायलिश अंदाज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, चाहते तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. (सर्व फोटो सौजन्य: पूर्णिमा डे/इन्स्टाग्राम)
छातीत साठलेला कफ, जुनाट खोकला ३ दिवसांत बाहेर पडेल! करा ‘हे’ ३ सोपे घरगुती उपाय; चोंदलेलं नाक उघडेल अन् जड झालेली छाती होईल मोकळी!