-
कृतिका देव सध्या स्टार प्रवाहवरील ‘लपंडाव’ मालिकेत सखी कामत ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे, जिच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक होत आहे.
-
कृतिकाने या मालिकेत साकारलेली सखी कामत ही हळवी आणि सशक्त व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालत आहे.
-
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून तिने निसर्गरम्य वातावरणात हे विशेष आणि खास फोटोशूट पूर्ण केले आहे.
-
या सुंदर फोटोशूटमध्ये कृतिकाने जांभळ्या रंगाची रेशमी साडी नेसली असून, त्यासोबत हिरव्या रंगाचा काठ असणारा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
तिच्या या पारंपरिक लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी तिने गळ्यात मोत्यांची बारीक माळ, कानात पारंपरिक कर्णफुले, नाकात सुरेख नथनी असा खास दागिन्यांचा साज चढवला आहे.
-
हिरवळीने नटलेल्या निसर्गरम्य पार्श्वभूमीत केलेल्या या फोटोशूटमुळे आणि कृतिकाच्या नजाकतीमुळे तिच्या या लूकच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
-
कृतिकाचा हा अस्सल मराठी पारंपरिक अंदाज आणि तिची मोहक अदा चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: कृतिका देव/इन्स्टाग्राम)
CJP Jantar Mantar Protest Live Updates : “वर्षभर शांततेचा भंग करता येणार नाही”; कोर्टाच्या अटीवर दिपके, दास आणि रांका यांची २४ तासांनी सुटका