-
मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे सध्या चर्चेत आहे.
-
मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे सध्या चर्चेत आहे.
-
नुकतेच तिने तिच्या अकाउंटवर मराठमोळ्या आणि अत्यंत मनमोहक अशा पारंपरिक फोटोशूटचे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये तिने गडद जांभळ्या रंगाची काठपदराची नऊवारी साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
नाकात पारंपरिक नथ, कानात झुमके, गळ्यात नाजूक माळ आणि हातात बांगड्या असा तिचा परिपूर्ण साज दिसत आहे.
-
या फोटोंना तिने ‘Wrapped in tradition, draped in grace’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
चेहऱ्यावरील प्रसन्न भाव आणि तिचे हे पारंपरिक रूप सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक करत आहेत. (सर्व फोटो सौजन्य: ऋतुजा बागवे/इन्स्टाग्राम)
“साहिल तू खालच्या जातीचा आहेस मी तुला अडकवेन असं प्राध्यापक डुल्ला म्हणाले होते”, रविंद्र वाकोडेंचा गंभीर आरोप