-
मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निवेदिका आहे.
-
मृण्मयी सध्या झी मराठीवरील ‘सारेगमप’ (Sa Re Ga Ma Pa Marathi Li’l Champs) या संगीताच्या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे.
-
‘सारेगमप’चे हे नवीन पर्व २२ ऑगस्ट २०२६ पासून झी मराठी आणि ‘ZEE5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झाले आहे.
-
या पर्वात प्रसिद्ध संगीतकार-गायक अवधूत गुप्ते आणि लोकप्रिय गायिका वैशाली सामंत हे परीक्षकाची जबाबदारी पार पाडत आहेत.
-
मृण्मयीने या कार्यक्रमातील तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मृण्मयीने परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.
-
मृण्मयीने ‘कुंकू’ या मालिकेपासूनच झी मराठीच्या माध्यमातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)
AI वर अतिविश्वास धोकादायक; एआयच्या एका चुकीमुळे तुमचं घटनेबाबतचं आकलन कसं बदलतं?