-
प्राजक्ता गायकवाड ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय अशी गुणी अभिनेत्री आहे.
-
गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या उत्साही सणानिमित्त प्राजक्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर खास फोटो शेअर केले आहेत.
-
दहीहंडीच्या उत्सवासाठी प्राजक्ताने काळ्या रंगाची एक अत्यंत आकर्षक आणि एम्ब्रॉयडरी वर्क असलेली डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
साडीवर सिक्विन आणि जरीचे सुरेख नक्षीकाम असून, त्यावर तिने मॅचिंग एम्ब्रॉयडरी असलेला नेटचा जॅकेट ब्लाऊज कॅरी केला आहे.
-
तिच्या या साडीवर तिने गळ्यात काहीही न घालता, केवळ कानांमध्ये मोठे, चमकदार सिल्व्हर स्टोन आणि डायमंड वर्क असलेले झुमके घातले आहेत.
-
हात रिकामे ठेवून, तिने बोटात नाजूक अंगठ्या घातल्या आहेत. वेस्टर्न आणि एथनिक, असा सुरेख मेळ तिच्या या दागिन्यांमधून दिसून येतो.
-
गुलाबी रंगाची लिपस्टिक, गुलाबी आयशॅडो आणि मोकळ्या सोडलेल्या लांब मोकळ्या केसांमुळे तिचा हा लूक अधिकच रुबाबदार आणि ग्लॅमरस दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
ठाणे : शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या