-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री खुशबू तावडे हिने आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
५ सप्टेंबर रोजी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने पती आणि मुलांसोबत श्री क्षेत्र अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतले.
-
वाढदिवसाचे औचित्य साधून तिने कुटुंबासह श्री स्वामी समर्थांच्या चरणी माथा टेकवत आशीर्वाद घेतले.
-
या भक्तिमय दर्शनाचे सुंदर फोटो अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये खुशबूने गुलाबी रंगाचा प्रिंटेड कुर्ता परिधान केला असून डोक्यावर ओढणी घेतलेला तिचा सोज्वळ लूक उठून दिसत आहे.
-
तिचा पती संग्राम साळवी पांढऱ्या शर्टमध्ये तर दोन्ही मुले त्यांच्यासोबत अतिशय आनंदात दिसत आहेत.
-
हे फोटो शेअर करत तिने ‘श्री स्वामी समर्थ अक्कलकोट’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि कलाकारांनी या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव करत खुशबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: खुशबू तावडे/इन्स्टाग्राम)
छतावर सौरप्रकल्प बसवला, तरी शिल्लक विजेचा लाभ मिळणार नाही? नव्या मसुद्यात नेमके काय आहे?