-
अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही तिची उत्कृष्ट अभिनयशैली आणि सोज्वळ सौंदर्य यांच्या जोरावर नेहमीच चाहत्यांची मने जिंकून घेते.
-
तिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पारंपरिक पोशाखातील काही खास आणि आकर्षक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती लाल रंगाचा हेवी वर्क असलेला पंजाबी सूट आणि त्यावर मॅचिंग धोती-सलवार परिधान करून अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी तिने कानामध्ये लांब पारंपरिक झुमके, हातात अंगठ्या आणि सुंदर हातफूल परिधान केले आहे.
-
मोकळे सोडलेले केस, कपाळावर छोटी लाल टिकली आणि हातातील गजरा तिच्या या पारंपरिक सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
विशेष म्हणजे दहीहंडीच्या विशेष प्रसंगासाठी तिने हा खास पारंपरिक आणि देखणा लूक साकारला होता.
-
हे फोटो शेअर करताना तिने ‘A slow Sunday is my kinda luxury’ अशी सुंदर कॅप्शनदेखील दिली आहे.
-
तिच्या या नटखट आणि हसर्या फोटोंवर सध्या तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. (सर्व फोटो सौजन्य: जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)
सतीश सालियन यांच्या ५०० कोटींच्या मानहानीच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचे उत्तर; माफी मागण्यास नकार