-
अभिनेत्री आणि मॉडेल आयशा खान तिच्या खास स्टाईल आणि बोल्ड फॅशनमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
आयशाने नुकतीच एका भव्य दहीहंडीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून खास उपस्थिती लावली होती.
-
या दहीहंडी उत्सवासाठी आयशाने पारंपारिक मराठी वेशभूषा साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
-
या खास प्रसंगी आयशा खानने हिरव्या रंगाची सुंदर अन् आकर्षक साडी नेसून मराठमोळा लूक परिधान केला होता.
-
तिच्या या साडीवरील नक्षीकाम आणि त्यावर घातलेले मराठमोळे दागिने तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते.
-
लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात ठुशी, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावून अस्सल मराठी साज शृंगार केला होता.
-
आयशाचा हा सुंदर आणि सोज्वळ मराठमोळा अवतार पाहून तिचे चाहते सोशल मीडियावर तिचे भरभरून कौतुक करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: आयशा खान/इन्स्टाग्राम)
बाई, आता आम्ही गरीब झालोय… शिक्षेकेला चिमुकल्याने दिलं मजेशीर उत्तर; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “पोरगं लय हुशार”