-
Madhurani Gokhale Swarali Prabhulkar Dubai Vacation: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी गोखले सध्या लेक स्वरालीबरोबर दुबई सफारीचा आनंद घेत आहे.
-
शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा ब्रेक घेत मधुराणीने ही खास ट्रिप प्लॅन केली.
-
दुबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देत मधुराणी आणि स्वरालीने मिळून खूप धमाल केली.
-
पेंग्विनबरोबरचे काही क्यूट फोटो, तसेच दुबईतील मॉडर्न आर्ट आणि उत्कृष्ट आर्किटेक्चरचा आनंद घेतानाचे क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
बुर्ज खलिफामधील फोटोंना मधुराणीने ‘जीवाची दुबई’ असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
मालिकेत नेहमी साडी किंवा पारंपरिक कपड्यांमध्ये दिसणाऱ्या मधुराणीचा या ट्रिपदरम्यान वेस्टर्न लूक पाहायला मिळाला.
-
आई-लेकीचे हे खास बाँडिंग आणि त्यांच्या सुट्ट्यांचे फोटो सध्या चाहत्यांच्या भलतेच पसंतीस पडत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
विनोद कांबळीचा निदान वृद्धाश्रम आणि केअर सेंटरमधला व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले; ‘काळजी घे..’