-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि अभ्यासू अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमीच तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेते.
-
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या स्पृहाने नुकतेच तिचे काही नवीन आणि अत्यंत सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये स्पृहाने गुलाबी रंगाचा अत्यंत मोहक आणि पारंपरिक जोड असलेला ड्रेस परिधान केला आहे.
-
स्पृहाने गुलाबी रंगाचे बांधणी प्रिंटेड डिझायनर जॅकेट आणि शरारा परिधान केला आहे, त्यावर सोनेरी रंगाची नक्षी आहे.
-
गळ्यात मोत्यांचा सुंदर चोकर हार, हातात सोन्याच्या बांगड्या आणि केसांचा आकर्षक अंबाडा तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
खिडकीजवळ उभे राहून दिलेली तिची ही नखरेल पोज आणि चेहऱ्यावरील हास्य चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
-
या सुंदर फोटोंना शेअर करत स्पृहाने ‘कहूँ भी गुलाबी मैं सहूँ भी गुलाबी लगता है मैं रहूँ गुलाबी रे…’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
स्पृहाच्या या नवीन फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून तिचा हा लूक खूप पसंत केला जात आहे. (सर्व फोटो सौजन्य: स्पृहा जोशी/इन्स्टाग्राम)
‘पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी अभिजीत दिपके, सीजेपीला अमेरिकेतून फंडिंग’, सिंगर मेरी मिलबन यांचा खळबळजनक दावा