-
झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ (Taarini TV Serial) ही मालिका तिच्या दमदार कथानकामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या मालिकेत पुढे काय घडणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते.
-
तारिणी आणि तिची टीम प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने तपास करत, समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर मात करून गुन्हे उघडकीस आणताना दिसते.
-
या मालिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ‘कौशिकी खांडेकर’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
-
अभिज्ञाने नुकताच श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त एक सुंदर लूक केला होता.
-
या खास प्रसंगी अभिज्ञाने राखाडी रंगाची साडी आणि त्यावर आकर्षक डिझाईनर ब्लाऊज परिधान केला होता.
-
या फोटोंना कॅप्शन देताना अभिज्ञाने लिहिले आहे, “भक्ती जीवन बदलते, भाग्य नाही!”
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
माधुरी दीक्षित पोहोचली मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! कारण आहे खूपच खास, डॉ. नेने म्हणाले, “प्रेमळ आदरातिथ्य…”