-
हिरड्यांमधून रक्त येणे, सूज, वेदना आणि हिरड्या कमकुवत होणे या समस्यांवर पेरूची पाने हा एक अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक उपाय मानला जातो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पेरूच्या पानांमध्ये टॅनिन, फ्लेवोनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे दाह कमी करून हिरड्यांना मजबूत बनवण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पेरूच्या पानांमधील अँटीसेप्टिक गुणधर्म तोंडाची स्वच्छता राखतात, हानिकारक जीवाणू नष्ट करतात आणि दुर्गंधीची समस्या दूर करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
दररोज पेरूची ताजी पाने चावून खाल्ल्याने हिरड्यांमधून रक्त येणे थांबते, वेदना कमी होतात आणि कमकुवत झालेल्या हिरड्या पुन्हा मजबूत होतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
या पानांमधील अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे हिरड्यांना होणारा संसर्ग आणि सूज येण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
तज्ज्ञांचा सल्ला हिरड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि अधिक चांगल्या परिणामांसाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी पेरूची ताजी पाने चावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पेरूच्या पानांचा वापर कसा करावा? पेरूची स्वच्छ ताजी पाने दररोज पाच ते सात मिनिटे चावून खावीत किंवा त्यांच्या पानांचा रस काढून थेट हिरड्यांवर लावावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पेरूची पाने हा हिरड्यांसाठी एक उत्तम नैसर्गिक आणि सोपा घरगुती उपाय असला तरी त्रास जास्त वाढल्यास दंतचिकित्सकांचा (डेंटिस्ट) सल्ला घेणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
रोज १४ दिवस दुधामध्ये मखाना आणि जायफळ मिसळून प्यायल्याने काय फायदे मिळतात? वाचा सविस्तर