-
मायरा वायकुळ (Myra Vaikul) ही महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय बालकलाकार आणि सोशल मीडिया स्टार आहे.
-
आपल्या गोड आणि निरागस अभिनयाने मायराने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.
-
मायरा सध्या आपल्या कुटुंबाबरोबर सिंगापूरची सफर करत आहे.
-
सिंगापूर (Singapore) हा आशिया खंडातील एक अत्यंत समृद्ध, आधुनिक आणि सुंदर देश म्हणून ओळखला जातो.
-
मायराची आई श्वेता वायकुळने सोशल मीडियावर त्यांच्या या सिंगापूर दौऱ्याचे खास फोटो शेअर केले आहेत.
-
जगातल्या सर्वोत्तम विमानतळांपैकी एक असलेल्या चांगी विमानतळावरील (Changi Airport) प्रसिद्ध भव्य कृत्रिम धबधबा (Jewel Waterfall) आहे.
-
‘गार्डन्स बाय द बे’ (Gardens by the Bay) येथील आकर्षक ‘सुपरट्रीज’ आणि जगातील सर्वात मोठ्या काचेच्या हरितगृहाला त्यांनी भेट दिली.
-
हे फोटो शेअर करत श्वेताने “आपल्या स्वप्नांच्या शहराकडे उड्डाण करत आहोत… कारण स्वप्नं ही फक्त पाहण्यासाठी नसतात, तर ती जगण्यासाठी असतात!” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)
बाई, आता आम्ही गरीब झालोय… शिक्षेकेला चिमुकल्याने दिलं मजेशीर उत्तर; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “पोरगं लय हुशार”