-
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) लवकरच महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘बंडखोर’ (Bandkhor Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
अन्यायकारक परिस्थितीविरोधात लढा देणाऱ्या सहा महिलांची संघर्षगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा मुंबईतील ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (NMACC) येथे पार पडला.
-
या सोहळ्यात प्रियदर्शिनीने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या सिल्क साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
‘बंडखोर’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील नव्या-जुन्या पिढीतील सहा गुणी अभिनेत्रींची मोट बांधली गेली आहे.
-
प्रियदर्शिनीबरोबरच छाया कदम, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
-
आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या सामान्य महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सहाजणींची गोष्ट असलेला ‘बंडखोर’ चित्रपट २४ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
Video: “तुम्ही तुमच्या घरचा फ्रीज उघडून पाहिला तर…” तुकाराम मुंढेंचं संवेदनशीलतेचा अभाव असल्याचं सांगत महत्वाचं आवाहन!