-
मराठी मनोरंजन विश्वातील लाडकं आणि लोकप्रिय दांपत्य म्हणजे अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar).
-
नुकतेच प्रथमेशने सोशल मीडियावर क्षितिजाबरोबरचे काही अतिशय रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
या नव्या फोटोशूटमध्ये दोघांचेही ट्विनिंग आणि केमिस्ट्री चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
या खास फोटोशूटसाठी प्रथमेश आणि क्षितिजाने व्हाइट थीम निवडली होती.
-
प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा क्लासिक शर्ट-पॅण्ट परिधान केला आहे, तर क्षितिजा पांढऱ्या रंगाच्या सुंदर ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे.
-
दोघांच्या या रोमँटिक अंदाजावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव केला आहे.
-
१४ फेब्रुवारी २०२४ (व्हॅलेंटाईन डे) रोजी या जोडीचा साखरपुडा पार पडला आणि अवघ्या १० दिवसांत म्हणजेच २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दोघेही मोठ्या थाटामाटात विवाहबंधनात अडकले.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब/इन्स्टाग्राम)
कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू, तरी नाना पाटेकरांच्या बाबतीत ‘मेडिको-लीगल केस’ का नोंदवली? कायदा काय सांगतो?