-
सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा अतिशय लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) गेली अनेक वर्षे अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवत आहे.
-
दर्जेदार विनोद, कलाकारांचे अफलातून सादरीकरण आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांशी जोडली गेलेली नाळ, यांमुळे हा कार्यक्रम आज घरोघरी लोकप्रिय ठरला आहे.
-
याच कार्यक्रमातील लाडकी अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे.
-
गोकुळाष्टमीच्या (दहीहंडी) शुभमुहूर्तावर नम्रताने फिकट गुलाबी रंगाची खणाची साडी आणि त्यावर जांभळ्या रंगाचा खणाचा ब्लाऊज परिधान केला होता.
-
या पारंपारिक खणाच्या साडीबरोबर नम्रताने मोत्यांचे नजाकतदार दागिने परिधान केले होते.
-
हलका मेकअप आणि केसांत माळलेला गजरा नम्रताच्या या लूकला अधिकच सुंदर बनवत आहे.
-
हे खास फोटो शेअर करत नम्रताने, “थोडीशी परंपरा, थोडीशी नजाकत आणि भरभरून प्रेम!” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
शिवाजी पार्कवरील आंदोलनानंतर तक्रार दाखल होताच अभिजित दिपके यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…