-
जेवल्यानंतर लगेचच पोट फुगणे, गॅस होणे किंवा जडपणा जाणवणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. परंतु, औषधे न घेता काही सोप्या योगासनांचा आणि व्यायामांचा दैनंदिन दिनक्रमात समावेश केल्यास पचनक्रिया सुधारून या त्रासापासून त्वरित आराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
मार्जरीआसन (कॅट-काऊ स्ट्रेच)
हे आसन आतड्यांची हालचाल सुधारून पोटातील अवयवांना हलका मसाज करते, ज्यामुळे पोट फुगणे आणि अस्वस्थता कमी होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
शशांकासन (चाइल्ड्स पोज)
हा स्ट्रेच पोटातील स्नायूंचा ताण पूर्णपणे हलका करतो आणि जड जेवणानंतर पचनक्रिया जलद करण्यास मदत करतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
उदर श्वसन (डीप बेली ब्रीदिंग)
हळूवार आणि खोल श्वास घेतल्याने पोटाचे स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे पोटातील वेदना आणि अस्वस्थता कमी होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
उत्तानासन (फॉरवर्ड फोल्ड)
हे आसन केल्याने पचनसंस्थेतील अवयवांकडे रक्ताभिसरण वाढते आणि पोट फुगण्यापासून त्वरित आराम मिळतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पवनमुक्तासन (नीज टू चेस्ट पोज)
पोटातील अडकलेला गॅस बाहेर काढण्यासाठी, पोटाचा जडपणा कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
शतपावली (लाइट वॉकिंग)
जेवणानंतर हळूहळू चालल्यामुळे आतड्यांची हालचाल उत्तेजित होते आणि पोटात गॅस साचून राहत नाही. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
वक्रासन (सीटेड टॉर्सेल ट्विस्ट)
बसून धड दोन्ही बाजूला वळवल्यामुळे पोटातील दाब कमी होतो आणि साचलेला गॅस सहज बाहेर पडतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
छातीत साठलेला कफ, जुनाट खोकला ३ दिवसांत बाहेर पडेल! करा ‘हे’ ३ सोपे घरगुती उपाय; चोंदलेलं नाक उघडेल अन् जड झालेली छाती होईल मोकळी!