-
क्लॅम शेल व्यायाम (Clam Shells): एका कुशीवर झोपून पाय गुडघ्यात दुमडा आणि वरचा पाय वर-खाली करा. या व्यायामाने नितंबाचे स्नायू मजबूत होतात आणि गुडघेदुखी कमी होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
हॅमस्ट्रिंग कर्ल्स (Hamstring Curls): सरळ उभे राहून पायांच्या टाचा पार्श्वभागाकडे मागे टेकवल्यामुळे मांडीच्या मागील भागातील स्नायू भक्कम होण्यास मोठी मदत मिळते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
काफ रेजेस (Calf Raises): सरळ उभे राहून पायाच्या बोटांवर शरीराचा भार पेलत टाचा वर उचलल्याने पायाच्या पिंडऱ्या मजबूत होतात आणि गुडघ्यांचा समतोल सुधारतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
सीटेड लेग एक्स्टेंशन्स (Seated Leg Extensions): खुर्चीवर बसून एक पाय हळूहळू समोर सरळ लांब करून खाली घेतल्याने मांडीच्या पुढील स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
स्टेप अप्स (Step Ups):
पायरी किंवा पाटावर आलटून-पालटून पाय ठेवून चढ-उतार केल्याने गुडघ्यांच्या भोवतालची स्थिरता आणि ताकद वाढते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
स्ट्रेट लेग रेजेस (Straight Leg Raises): पाठीवर सरळ झोपून एक पाय न वाकवता हळूच वर उचलल्यामुळे गुडघ्यावर ताण न येता, मांडीचे पुढचे स्नायू मजबूत होतात (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
वॉल सिट्स (Wall Sits): भिंतीला टेकून खुर्चीसारख्या स्थितीत काही वेळ बसून राहिल्याने किंवा पाय ताणल्याने गुडघ्याच्या सांध्यांची हालचाल सुलभ होऊन वेदना कमी होतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
हे व्यायाम प्रकार रोज नियमितपणे केल्यास गुडघ्यांचे दुखणे कमी होऊन, पायांची एकूण ताकद नक्कीच वाढू शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
‘तुकारामजी तुमच्या नजरेतून काहीही सुटत नाही’; अभिनेत्री मल्लिका शेरावतने मराठीत मानले तुकाराम मुंढेंचे आभार