-
Priyadarshini Indalkar Jayanti 2 Movie Premiere: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा ‘जयंती २’ हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
-
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि त्याची खूप चर्चा झाली होती.
-
या चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यात प्रियदर्शिनीने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि राखाडी रंगाचा स्कर्ट असा सुंदर वेस्टर्न लूक केला होता, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
-
‘जयंती २’ या चित्रपटातून कॉलेजमधील रॅगिंग आणि भेदभावाचा मुद्दा मांडण्यात आला आहे.
-
चंद्रपूरसारख्या भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या ‘पायल’ नावाच्या मुलीची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
-
या चित्रपटाची निर्मिती ‘मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ’ने केली असून, कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे.
-
या चित्रपटात प्रियदर्शिनीबरोबर अभिनेता ऋतुराज वानखेडे, पायल जाधव, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष अशी दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
“नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले…”, अदिती सारंगधरने सांगितली भावुक आठवण; म्हणाली, “इतकं समाधान…”