-
लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळ (Myra Vaikul) सध्या आपल्या कुटुंबाबरोबर सिंगापूर सफरीचा आनंद घेत आहे.
-
नुकतेच मायराची आई श्वेता वायकुळ यांनी सोशल मीडियावर सिंगापूर प्राणीसंग्रहालयातील (Singapore Zoo) काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
सिंगापूर प्राणीसंग्रहालय हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि उत्कृष्ट प्राणीसंग्रहालयांपैकी एक मानले जाते.
-
हे प्राणीसंग्रहालय प्रामुख्याने त्याच्या ‘ओपन कन्सेप्ट’साठी (Open Concept) ओळखले जाते.
-
येथे प्राण्यांना लोखंडी पिंजऱ्यांत बंदिस्त न ठेवता, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाशी जुळणाऱ्या मोकळ्या वातावरणात ठेवले जाते.
-
पर्यटक आणि प्राण्यांच्या सुरक्षेसाठी लोखंडी गजांऐवजी नैसर्गिक खंदक, लाकडी अडथळे किंवा काचेच्या पारदर्शक भिंतींचा वापर केला जातो.
-
जवळपास २८ हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या भव्य प्राणीसंग्रहालयात ३०० हून अधिक प्रजातींचे ४,२०० पेक्षा जास्त प्राणी पाहायला मिळतात.
-
मायराच्या या व्हेकेशन फोटोंना तिच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर मोठी पसंती मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)
डाळींमध्ये कुळीथ का ठरतंय खास? जाणून घ्या शरीरासाठी किती फायदेशीर