-
योग हा प्राचीन भारताचा असा अमूल्य ठेवा आहे की, ज्याच्या मदतीने केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही सक्षम राहता येते. नियमित योग केल्याने ताणतणाव कमी होण्यास, शरीराची लवचिकता व समतोल वाढवण्यास, स्नायू मजबूत ठेवण्यास, शरीराची ढब (पोश्चर) सुधारण्यास आणि एकाग्रता वाढविण्यास मदत होते. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही योगाभ्यासाची सुरुवात करीत असाल, तर कोणते योगप्रकार करावेत ते जाणून घेणे गरजेचे आहे.
-
तुम्ही जर योगासनांना नव्याने सुरुवात करीत असाल, तर ताडासन आणि बालासन यांसारख्या सोप्या आसनांपासून करू शकता. नवशिक्यांसाठी ही सर्वांत सोपी आणि प्रभावी आसने मानली जातात.
-
ताडासन कसे करावे?
ताडासन करण्यासाठी शरीर सरळ रेषेत ठेवून हात आणि पाठीचा कणा वरच्या दिशेने ताणला (स्ट्रेच केला) जातो. -
होणारे फायदे
हे आसन शरीराची ढब सुधारण्यास, पाठीचा कणा ताणण्यास आणि शरीरात समतोल व स्थिरता राखण्यास मदत करते. तसेच पाय आणि पायाच्या घोट्यांचे स्नायू सक्रिय ठेवण्यासही याचा फायदा होतो. सुरुवातीला ताडासन २० ते ३० सेकंदांसाठी दोन ते तीन वेळा केले जाऊ शकते. -
बालासन कसे करावे?
बालासनला चाइल्ड पोज, असेही म्हणतात. त्यामध्ये गुडघ्यांवर वर बसून, शरीराचा वरचा भाग पुढे झुकवला जातो. -
होणारे फायदे
बालासन शरीराला विश्रांती देण्यास, पाठ व खांद्यांचा ताण कमी करण्यास आणि मन शांत ठेवण्यास मदत करते. -
किती वेळ करावे?
सुरुवातीला ३० ते ६० सेकंदांपर्यंत बालासन सहजपणे केले जाऊ शकते. हे आसन दोन ते तीन वेळा पुनरावृत्ती करून करू शकता. -
योग करताना श्वासोच्छ्वास सामान्य ठेवावा. कोणत्याही स्थितीत वेदना किंवा अस्वस्थता जाणवल्यास तो योग प्रकार तत्काळ थांबवावा. तसेच तुम्हाला कोणताही शारीरिक किंवा मानसिक त्रास असल्यास योग सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
सकाळी लवकर उठण्यापासून ते सहानुभूती जपण्यापर्यंत… कोंबड्यांकडून माणसांनी शिकावेत असे ५ गुण; चाणक्यांनी सांगितले