-
मुंबईत नुकताच ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा अतिशय दिमाखात पार पडला.
-
प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता संभेराव हिने आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याच्या जोरावर या पुरस्कार सोहळ्यात मानाचे स्थान पटकावले.
-
‘नाच ग घुमा’ या लोकप्रिय चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी नम्रताला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं.
-
या खास प्रसंगी तिने सुंदर गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती, तिचा पारंपरिक लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.
-
तिच्या या मोठ्या यशानंतर तिचा पती योगेश संभेराव याने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक आणि खास पोस्ट शेअर केली आहे.
-
योगेशने पोस्टमध्ये लिहिले, “तुझ्या अभिनयाला मिळालेली ही बक्षिसे पाहताना मन खरंच अभिमानाने भरून आलं… तू जेव्हा रंगमंचावर उभी राहतेस, तेव्हा फक्त अभिनय करत नाहीस; तुझ्या मेहनतीची, तुझ्या स्वप्नांची आणि तुझ्यातल्या कलाकाराची एक सुंदर झलक सगळ्यांना दिसते. तुझ्या प्रत्येक यशामागे तू घेतलेली मेहनत, केलेला संघर्ष आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास मला माहीत आहे. आज तुला मिळालेली ही बक्षिसे माझ्यासाठी फक्त पुरस्कार नाहीत, तर तुझ्या कष्टांना मिळालेली दाद आणि तुझ्या स्वप्नांचा झालेला सन्मान आहे असे मला वाटते. तुझा नवरा म्हणून तुझा अभिमान वाटतोच… पण त्याहून जास्त आनंद याचा आहे की, माझ्या सोबतीची व्यक्ती इतकी गुणी, जिद्दी आणि प्रतिभावान आहे. अशीच पुढे जात राहा… तुझ्या प्रत्येक स्वप्नाच्या प्रवासात मी कायम तुझ्या सोबत आहे. तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझा खूप अभिमान आहे! तुझं यश म्हणजे माझ्यासाठीही आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. पुन्हा एकदा तुझे खूप खूप अभिनंदन, माझी गुणी बायको.”
-
योगेशने व्यक्त केलेल्या या भावनांवर आणि नम्रताच्या या यशावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
कोरड्याठाक मराठवाड्यातून नवरात्रीपूर्वीच स्थलांतर…