-
सन मराठी वाहिनीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ (Mee Sansar Majha Rekhite TV Serial) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून चांगलीच गाजत आहे.
-
या मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री दीप्ती केतकर (Dipti Ketkar) ‘अनुप्रिया’ ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.
-
दीप्ती ही मराठी चित्रपट व मालिका विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय, अभ्यासू, गुणी अभिनेत्री आणि प्रशिक्षित नृत्यांगना आहे.
-
नुकतीच दीप्तीने एका मंगळागौरीच्या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या प्रसंगासाठी दीप्तीने सुंदर गुलाबी रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.
-
या नऊवारी लूकवर दीप्तीने नाजूक मोत्यांच्या दागिन्यांचा साज शृंगार केला होता.
-
आकर्षक मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल करून दीप्तीने हा पारंपारिक लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीप्ती केतकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : मराठी अभिनेत्रींचा ८०च्या दशकातील खास AI लूक पाहिलात का?)
Video: “…तीच आमची मोठी चूक ठरली, आम्हीच आमच्या मुलाला…”, IIT मुंबईत आत्महत्या केलेल्या साहिल वाकोडेच्या आई-वडिलांचा आक्रोश!