-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.
-
तिच्या सुंदर आणि ग्लॅमरस लूकचे हे खास फोटो इन्स्टाग्रामवर विदुला लिमये मेकअप आर्टिस्ट यांनी शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये अमृताने अतिशय सुंदर अशी गुलाबी रंगाची पारंपरिक साडी परिधान केली आहे.
-
तिच्या साडीवर सोनेरी रंगाची नाजूक बॉर्डर आणि पदरावर आकर्षक डिझाइन पाहायला मिळत आहे.
-
आपला लूक अधिक खुलवण्यासाठी तिने गळ्यात मोत्यांचा आणि कुंदन काम असलेला चोकर नेकलेस परिधान केला आहे.
-
तिच्या चेहऱ्यावरील गॉर्जियस मेकअप, गुलाबी लिपस्टिक आणि कपाळावरील लहान गुलाबी रंगाची चंद्रकोर तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
अमृताचा हा पारंपरिक आणि शाही लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून या फोटोंवर प्रेक्षकांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
Photos: गायत्री दातारचा पतीबरोबर स्पेनमध्ये सफरनामा; दोघांच्या रोमँटिक फोटोंची चर्चा