-
‘बिग बॉस मराठी ६’ मुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अनुश्री माने सध्या चर्चेत अली आहे.
-
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या अनुश्रीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अत्यंत सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने गडद जांभळ्या रंगाची अत्यंत सुंदर आणि सोनेरी बॉर्डर असणारी डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर तिने मॅचिंग डिझायनर ब्लाऊज घातला असून साडीच्या वर्कमुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
-
तिच्या या लूकला साजेसा असा नाजूक मोत्यांचा हार आणि कानात सुंदर सोनेरी झुमके तिने परिधान केले आहेत.
-
केस मोकळे सोडून, त्यावर घातलेला गजरा आणि कपाळावरील चंद्रकोर तिच्या या रॉयल लूकला अधिक परिपूर्ण बनवते.
-
अनुश्रीने सोशल मीडियावर तिच्या या फोटोंना ‘गुलछडी’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
तिचा हा मनमोहक अंदाज आणि गोड हास्य पाहून चाहत्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो सौजन्य: अनुश्री माने/इन्स्टाग्राम)
अग्रलेख : पाडायचे की पडायचे?