-
शरीराच्या मजबुतीसाठी प्रथिने आवश्यक असली तरी त्यांचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत असून यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होत आहे.
-
पचनक्रियेचे आजार
आहारात तंतूमय पदार्थांची कमतरता आणि प्रथिनांचे जास्त प्रमाण यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि आतड्यांच्या समस्या निर्माण होतात. -
हृदयरोग
लाल मांस आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधून मिळणाऱ्या प्रथिनांमुळे रक्तातील मेदाचे प्रमाण वाढून हृदयाच्या विकारांचा धोका वाढतो. -
शरीरातील पाण्याचा तुटवडा
प्रथिनांचे विघटन करताना टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी जास्त पाणी लागते, ज्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो. -
मूत्रपिंडावर ताण
प्राणिजन्य प्रथिनांच्या अतिसेवनामुळे रक्तातील युरियाचे प्रमाण वाढून मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. -
पोषक तत्त्वांची कमतरता
केवळ प्रथिनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्वांची आणि खनिजांची मोठी त्रुटी निर्माण होते. -
वजन वाढणे
अतिरिक्त प्रमाणात प्रथिने खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त ऊर्जा जमा होते आणि त्याचे रूपांतर चरबीमध्ये होऊन वजन वाढते. -
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
‘यूपीआय’ व्यवहार करण्याआधी ग्राहक अन् व्यापाऱ्याने ‘या’ महत्वाच्या ११ गोष्टी जाणून घ्याव्या…