-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या (Ashvini Mahangade) नव्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
अश्विनीने नुकतेच दहीहंडी २०२६ मधील तिचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अश्विनीने हिरव्या रंगाची डिझायनर नऊवारी साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या पारंपरिक नऊवारी लूकवर अश्विनीने परिधान केलेले पारंपरिक दागिने तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहेत.
-
या फोटोंना कॅप्शन देताना अश्विनीने लिहिले आहे “नऊवारीचा साज, नथीचा रुबाब, कपाळी कुंकू आणि मनात स्वाभिमान, हा शृंगारच माझी खरी ओळख आणि अभिमान!”
-
अश्विनीच्या या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा तुफान वर्षाव केला आहे.
-
अनेक लोकप्रिय मराठी मालिका आणि चित्रपटांतून अश्विनीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
नानांवरील तनुश्री दत्ताच्या आरोपांवर मल्हार पाटेकरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “अशा लोकांना मी…”