-
अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि अभिनेता प्रसाद जवादे (Prasad Jawade) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे.
-
नुकतेच अमृताने प्रसादबरोबरचे काही खास ८० च्या दशकातील रेट्रो रोमँटिक फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
सध्या सोशल मीडियावर ‘८० चे दशक’ (1980s Retro Trend) रीक्रिएट करण्याचा AI ट्रेंड तुफान गाजतोय.
-
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने स्वतःचे फोटो विंटेज किंवा क्लासिक लूकमध्ये बदलणे लोकांना खूप आवडत आहे.
-
जुन्या काळातील फॅशन, अनोखी हेअरस्टाइल आणि फोटोग्राफीची शैली यांमुळे ४० वर्षांपूर्वीच्या काळात स्वतःला किंवा आपल्या लाडक्या कलाकारांना पाहणे चाहत्यांसाठी नक्कीच रंजक ठरत आहे.
-
अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
प्रसाद झी मराठीवरील ‘दीप ज्योती’ या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
“अजय देवगण माझ्याशी २० वर्षांपासून बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”